मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता चित्रपट, मालिका निर्मात्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक करणार आहेत, तसंच दुपारी 1 वाजता कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख उद्योजकांसमवेत चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून येत्या २ दिवसात ठोस निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत आहेत.
दरम्यान, लॉकडाऊनच्या दिशेने हालचाली वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी काही ठराविक शहरात निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुंबईतही रात्री ८ नंतरही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आता रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
Comments
Loading…