in

शेतकरी आंदोलनाशी संबंधीत पाकिस्तानी अकाउंट्स बंद करा; सरकारने दिले ट्विटरला निर्देश

लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषी कायद्यावरुन शेतकरी आक्रमक झाले आहेत. कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचीमाहिती पसरवणारी १,१७८ पाकिस्तानी ट्विटर अकाउंट्स बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ट्विटरला दिले आहेत.

मात्र अजून ट्विटरने यावर काही निर्णय घेतला नाही आहे. गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ही मागणी केली होती की, नव्या यादीत खलिस्तान्यांप्रती सहानुभूती दाखवणारे आणि पाकिस्तानशी संबंधित अकाउंट्सचाही समावेश आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान चुकीची सूचना देण्यासाठी करण्यात येत आहे. देशात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधादरम्यान हे अकाउंट्स लोकांसाठी धोकादायक बनू शकतात, या आधारावर ते ब्लॉक करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने२५० ट्विटर अकाउंट्स ब्लॉक करण्याचा प्रस्ताव ट्विटरकडे दिला होता. या अकाउंट्सवरुन चुकीची माहिती पसरवण्याबरोबरच ‘किसान नरसंहार’ सारखे हॅशटॅगही वापरण्यात आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकल्याने पंतप्रधानांचा विरोधकांना टोला

भारतीय लोकशाही पाश्चिमात्य नव्हे, मानवी संस्था आहे – मोदी