in

नालासोपारा रेल्वे स्थानकात नागरिकांनी लोकल रोखून धरली…

Share

नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात आज अचानक नागरिकांनी अघोषित आंदोलन पुकारले आहे. रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिकांनी अत्यावश्यक लोकल रोखून धरली आहे.सामान्य नागरिकांना लोकल मद्ये प्रवास करण्याची मुभा द्यावी यासाठी नागरिक जमले होते. दरम्यान अचानक उसळलेल्या या गर्दीने गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच रेल्वे स्थानकावरून सध्या या आंदोलन कर्त्यांना हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

नालासोपारा स्टेशनवर प्रवशांचा गोंधळ, पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण

गेल्या जवळपास चार महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने सामान्य नागरिक घरीच होते. त्यात हातचा रोजगारही हिरावला होता. मात्र आता मिशन बिगेन अंतर्गत सर्वच सुरु करण्यात आल्याने सामान्य नागरिकांनाही लोकलमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, यासाठी सर्व नागरिक संतप्त होऊन ट्रॅकवर उतरले होते. विशेष म्हणजे हे नागरिक डेपो समोर जमले होते. यावेळी डेपोमध्ये बसचा नसल्याने त्यांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. यावेळी नागरिकांनी अत्यावश्यक सुरु असलेली लोकल पाहून ट्रॅकवर उतरून लोकल रोखून धरली. सामान्य नागरिकांनाही लोकल मधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी यासाठी नागरिक ट्रॅकवर उतरले होते.

नागरिकांनी अचानक अशाप्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणावर ट्रॅकवर गर्दी केल्याने गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान या नागरिकांना नियंत्रणात आणणे सुद्धा प्रवाशांसमोर मोठे आव्हानं ठरत होते. मात्र काही वेळेनंतर आरपीएफने या नागरिकांना हटवून ट्रॅक मोकळा केला. नागरिकांचा हा उद्रेक पाहून रेल्वे सेवा सुरु होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

भारतीय क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियात विलग करणार

Rajyasabha MP Oath Ceremony। शरद पवार, रामदास आठवले यांनी घेतली शपथ