in

CISCE RESULT 2020; आज लागणार दहावी-बारावीचा निकाल

Share

‘काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (सीआयएससीई) या मंडळाचा दहावीचा (आयसीएसई) आणि बारावीचा (आयएससी) निकाल आज, शुक्रवारी दुपारी 3 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. डिजीलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणपत्रकही घेता येईल.

परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना सीआयएससीईच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना पेपर पुर्नतपासणीची संधी देण्यात येणार आहे. ज्या विषयांची लेखी परीक्षा झाली, त्याच विषयांचे पेपर पुन्हा पुर्नतपासणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना पुर्नतपासणीसाठी निकाल लागल्यानंतर सात दिवसांत (16 जुलैपर्यत) अर्ज विहित शुल्कासह करता येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती सीआयएससीईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

असा निकाल पाहता येणार

  • सीआयएससीईच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘रिझल्ट २०२०’ या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांनी आयसीएसई किंवा आयएससी अभ्यासक्रम निवडावा.
  • विद्यार्थ्यांनी आपला यूनिक आयडी, इंडेक्स नंबर टाकावा.
  • निकाल पाहण्यासाठीच्या आवश्यक सूचना स्क्रीनवर दिसतील.

‘एसएमएस’द्वारे

मोबाईलवर एसएमएस’द्वारे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘आयसीएसई इयर २०२०’ किंवा ‘आयएससी इयर २०२०’ असे टाइप करून त्यापुढे सात आकडे असलेला यूनिक आयडी क्रमांक द्यावा. आणि हा मेसेज ‘०९२४८०८२८८३’ या क्रमांकावर पाठवावा. या मेसेजद्वारे विद्यार्थ्यांना सविस्तर निकाल पाहता येणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Major action on assets of Yes Bank co-founder, confiscation of assets at home and abroad

येस बँकेच्या सहसंस्थापकाच्या संपत्तीवर मोठी कारवाई, देश-विदेशातली संपत्ती घेतली ताब्यात

Vikas Dubey Encounter ;पोलीस चकमकीत विकास दुबेचा एन्काऊंटर