in

देशभरात नाताळ सणाचा उत्साह

Indian girls pose for photos near statues of decorative Santa Claus outside a church on Christmas in Mumbai, India, Thursday, Dec. 25, 2014. Christians make up about 2 percent of the population in India, a secular country of more than 1 billion people where Hindus form the overwhelming majority. (AP Photo/Rafiq Maqbool)
Share

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळाचा सण उत्साहात पण अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त अर्थात येशू ख्रिस्ताच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या संकाटाच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळ साजरा करताना सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. तोंडाला मास्क लावणे, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी २० पेक्षा अधिक लोकांची गर्दी होता कामा नये, रात्रीच्या नाताळ पार्ट्यावर निर्बंध, ६० वर्षांवरील व्यक्ती आणि लहान मुलांना शक्यतो घराबाहेर पडू नये, शक्यतो घरातच सेलिब्रेशन करावं, फिजिकल डिस्टंसिंगचे कसोशीने पालन करावे अशी नियमावली या निमित्त जाहीर करण्यात आली आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन देशवासियांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “मेरी ख्रिसमस! प्रभू ख्रिस्ताचे जीवन आणि तत्त्वं जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य देतात. ख्रिस्ताचा मार्ग सर्वांना न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज घडविण्याचा मार्ग दाखवत राहिल. प्रत्येकानं आनंदी आणि निरोगी रहावं.

राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विटद्वारे जनतेला शुभेच्छा देताना म्हटलं, “ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मी आशा करतो की हा सण शांती आणि समृद्धीचा प्रसार करत समाजात सौहार्द वाढवेल. चला आपण येशूच्या प्रेम, करुणा आणि परोपकारी शिकवणींचं अनुसरण करुयात. तसेच समाज आणि राष्ट्रहितासाठी संकल्पबद्ध ऱाहुयात.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

दिल्लीत आज पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये खळबळ

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary |25 डिसेंबरला साजरा केला जातो सुशासन दिन, का ते वाचा…