in

चिपी विमानतळाला ‘डीजीसीए’कडून मिळाला अधिकृत परवाना

चाकरमान्यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सज्ज झाले आहे. या विमानतळाला डीजीसीएने आज अधिकृत परवाना बहाल केला.त्यामुळे 9 ऑक्टोबरला उद्घाटनानंतर सिंधुदुर्गातील हवाई वाहतूक विनासायास सुरू होणार आहे. एअर अलायन्सचे एक विमान दररोज येथे येईल आणि मुंबईतील चाकरमान्यांना फक्त 2400 रुपयांत सिंधुदुर्गात येता येईल.

तब्बल 800 कोटी रुपये खर्च करून आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीने हे विमानतळ उभारले असून येथून केवळ प्रवासी वाहतूकच नव्हे तर भविष्यात मालवाहतूकही केली जाईल.त्यामुळे कोकणच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल असे मानले जाते. दरम्यान, चिपी विमानतळाच्या परवानगीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सुरेश प्रभू यांच्यासह अन्य मान्यवर मंत्री, अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“तू घरी कधी येतोयस?”; दीपिका पदूकोणच्या प्रश्नावर रणवीर सिंह म्हणाला…

H1B व्हिसावरील ट्रम्प यांचा नियम रद्द झाला