in

चिनी कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, 7600 कोटींचा केला करार

Share

सध्या भारत आणि चिनमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. भारत आणि चीनमधला तणाव पराकोटीचा वाढला असतांनाच दुसरीकडे चिनी कंपनीने महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केलीय.

7600 कोटींचा करार झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्याजवळील तळेगाव येथे उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी ‘ग्रेट वॉल मोटर्सने’ राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला असून या प्रकल्पात 1 बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार असून टप्प्याटप्प्याने ही गुंतवणूक केली जाईल.

याद्वारे जवळपास 3 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. चीनमधील आघाडीची कार उत्पादन कंपनी ‘ग्रेट वॉल मोटर्सने’ (GWM) मंगळवारी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याचे जाहीर केले असून यानुसार कंपनी तब्बल जवळपास 7 हजार 600 कोटी रुपये गुंतवणूक करणारं आहे.

या करारानंतर चीनच्या या कंपनीने भारतात गुंतवणूक करून चीनी सरकारला घरचा आहेर दिल्याची भावनाच उद्योग जगतात व्यक्त होतीय.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

ठाण्यातील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

एमपीएससीच्या स्थगित परीक्षांचं वेळापत्रक जाहीर