in

हॉट स्प्रिंग आणि गोगरामधून सैन्य माघारीस चीनचा नकार

संपूर्ण जग कोरोना महामारीला सामोरे जात अतानाच ‘भारतानं मिळालं त्यातच समाधानी राहावं’ असे म्हणतं नवीन वाद निर्माण केलाय. नियंत्रण रेषेवरील भारत आणि चीनमधील झालेल्या झडपेला आता एक वर्ष पूर्ण होत आलं आहे, परंतु आतापर्यंत दोन्ही देशांमधील परिस्थिती सामान्य झाली नाही. अहवालात असं म्हटलं आहे, की 9 एप्रिल रोजी झालेल्या कमांडर स्तराच्या बैठकीतही कोणताही विशेष तोडगा निघालेला नाही. असं म्हटलं जात आहे, की चीनने गोगरा पोस्ट आणि हॉट स्प्रिंग्जमधून आपले सैन्य माघारी घेण्यास नकार दिला आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये 11 बैठका झाल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार देपसांगचा मुद्दा सध्या कमांडर स्तरावरील पुढच्या बैठकीत बातचीतीसाठी ठेवण्यात आला आहे. देपसांग क्षेत्रात भारतीय लष्कराच्या गस्तीही चीननं रोखल्या आहेत. चीनी तुकड्या रोज गाडीनं याठिकाणी येतात आणि रस्ता अडवतात. आपल्या गस्तीच्या सीमेपर्यंतही भारतीय सैन्याला जाता येत नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lockdown Maharashtra | गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक वाहनांसाठी कलर कोड

राज्यात कडक लॉकडाऊन करा; उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा