in

चीनला परिणाम भोगावे लागतील; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा अमेरिकेकडून दिला जाणारा निधी रोखल्याची घोषणा केली आहे. कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात जागतिक आरोग्य संघटना पक्षपातीपणे काम करीत असल्याचा गंभीर आरोप यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. जागतिक आरोग्य संघटना चीनला झुकते माप देत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी अमेरिकेकडून दिला जातो.

कोरोना विषाणूच्या फैलाविषयी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) चीनने खोटी माहिती दिल्याचा आरोप करत, चीनला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. यामुळे कोरोना संसर्गाच्या मुद्यावरून अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध बिघडण्याची चिन्हे आहेत.

अमेरिकेने मागच्यावर्षी WHO ला ४० कोटी अमेरिकन डॉलरचा निधी दिला होता. WHO ला दिल्या जाणाऱ्या निधीचे काय करायचे? त्याबद्दल चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी यापूर्वी सुद्धा करोना व्हायरसचा जगभरात फैलाव होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल भूमिका घेतली असा आरोप केला होता. चीनमधून कोरोनाच्या उद्रेकाला सुरुवात झाली असून, अमेरिकेमध्ये त्याचे सर्वांत जास्त परिणाम दिसून येत आहेत.

कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावेल असून काल २४ तासात अमेरिकेत करोनामुळे २२२८ नागरिकांचा मृत्यू झाला.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या ७ वर

कोणतीही विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार नाही