in

त्या’ चिमुकल्याला मिळाली नवी सायकल , बच्चू कडूंनी दिला चिमुकल्याला सुखद धक्का!

अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील कोभाळणे गावातील हातावर पोट भरून संसाराचा गाडा चालवत असतानाच अचानक घरांना आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्यासह चिमुकल्याच्या आवडत्या सायकलचा सांगाडा झाला. या चिमुकल्याचा हा फोटो सोशल मिडीयावर खूप वायरल झाला होता. आई – वडिल घराची राख झाल्याने हताश झाले असतानाच चिमुकला मात्र सांगाडा झालेल्या सायकलकडे निशब्द होऊन बघत बसला होता.

सोशल मीडियात हा फोटा पाहून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या चिमुरड्यासाठी नवीन सायकलही पाठवली आहे. प्रहारचे अहमदनगर येथील पदाधिकारी यांनी रविवारी सर्व साहित्य घेऊन कोभाळणे येथे दाखल झाले. घर बांधणीसह संसारोपयोगी साहित्याची मदत बच्चु कडू यांच्यावतीने या चिमुकल्याच्या कुटूंबियांना देण्यात आली आहे. तसेच त्यांनी यावेळी आणखी मदतीचा शब्द दिला आहे.

नक्की काय झालं होत ?

अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या रखमाबाई पथवे यांच्या कुटुंबावर ही अपत्ती कोसळली. येथील ठाकर वस्तीला आग लागून त्यात चार झोपडीवजा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग लागली तेव्हा कर्ती माणसे कामावर गेली होती. माहिती मिळाल्यावर त्यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली तोपर्यंत सारे काही भस्मसात झाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विकेंड लॉकडाउनला सहकार्य करा – देवेंद्र फडणवीस

“अर्धवट लॉकडाउनने धड कोरोना जाणार नाही…आणि जनतेचं हित साधता येणार नाही”