जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम असलेल्या अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असं नामकरण करण्यात आलं होते. या नामकरणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच घेरले होते. या नामकरणावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलेच फटकारले आहे.
विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोटेरा स्टेडियमच्या मुद्द्यावर भाष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले, मोटेरा स्टेडियमचे नाव बदलल्यानंतर आता अशी चर्चा आहे, टीम इंडिया एकही सामना हरू शकत नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या मुद्यावर प्रतिक्रिया दिली होती. मोटेरा स्टेडियमचा निर्णय हा तिथल्या राज्य सरकारचा आहे त्यामध्ये आम्ही काय भूमिका घेऊ शकतो. स्टेडियमला पंतप्रधानांचं नाव दिलं आहे ज्यांना नको असेल त्यांनी स्पष्ट पणे बोलावं,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
Comments
Loading…