in

अर्थसंकल्पीय अधिवेशन: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक

सोमवारी (दि.८ मार्च) राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनानंतर सादर होणारा हा पहिलाच आर्थिक ताळेबंद असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र याआधी आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक बोलावली असून यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

उद्या अर्थसंकल्पासोबतच मराठा आरक्षणाची सुनावणी पार पडणार आहे.अनेक वर्षांपासून रखडलेले मराठा आरक्षण आता मार्गी लागतं का, हे पाहाण महत्वाच असणार आहे. त्यातच मनसुख हिरेन यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र ठाकरे सरकारवर टीका होत आहे. या मृत्यू संदर्भात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच सरकार पोलीस अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळे या विषयावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी 5.30 वाजता सह्याद्री अतिथी गृहावर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीतील सर्व मंत्री उपस्थिती लावतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol and Diesel price | अनेक दिवसांनंतर पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ नाही

कोरोना इफेक्ट : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित