in ,

मुख्यमंत्र्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा; देवेंद्र फडणवीस

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण कऱण्यास सांगितलं आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“उच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयने १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करुन त्याच्या आधारे पुढील कारवाई करण्यास सांगितलं आहे. एकाप्रकारे न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीच मान्य केली आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्‍यांची या प्रकरणातील भूमिका अशोभनीय असून मुख्यमंत्र्‍यांचं मौन आश्चर्यचकित करणार आहे असा हल्लाबोल देवेंद्र फडणवी यांनी केला आहे.

“महाराष्ट्रात सरकारच्या आणि मंत्र्यांच्या किंवा महत्वाच्या लोकांच्या आशीर्वादाने जे हफ्तेवसुलीचं काम होतं त्यासंदर्भात आज उच्च न्यायालायने एका प्रकारे कडक पाऊल उचललं आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारा हा जो काही मधला कार्यकाळ झाला आहे त्याचं सत्य समोर येईल. सीबीआय तपासात कशाप्रकारे हफ्ताखोरी चालली होती या गोष्टीदेखील बाहेर येतील,” असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देण्याची शक्यता?

कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील