in

छत्रपती उदयनराजे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची भेट

लोकशाही न्यूज नेटवर्क

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिल्यामुळे उदयनराजेंनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन आभार मानले.

काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणा योगींनी केली होती. यानंतर उदयनराजेंनी फोन करून योगींना धन्यवाद दिले होते.

खासदार उदयनराजेंनी टि्वट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. योगी यांच्या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या नात्याने राजमुद्रा भेट देऊन योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले, असे टि्वट उदयनराजेंनी केलं आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, 150 जण बेपत्ता, 10 मृतदेह हाती, बचावकार्य सुरु

टिकरी सीमेवर आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या; सुसाइड नोटही लिहिली