in

Maratha Reservation | “राज्यभिषेक सोहळ्यापर्यंत सरकारला अल्टिमेटम… आता पुढची भूमिका रायगडावरूनच”

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर छत्रपतींनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी “मी मराठ्यांच्या लढ्यातील शिपाई” असल्याचं त्यांनी संबोधलं आहे. सध्या मराठा समाजात अशांतता आहे. मराठे कधीही कायदा हातात घेऊ शकतात.

मात्र आज समाज माझ्यामुळे शांत आहे, असे छत्रपती म्हणाले. ५ मे रोजी निकाल लागल्यानंतर मी सर्व समाजाला शांत केलं. राज्याभिषेक सोहळा होईपर्यंत सरकारने मराठा समाजासंदर्भात काँक्रिट प्लॅन तयार न केल्यास संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे. यामध्ये मी देखील सहभागी होणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.

मराठा सामाजाला न्याय देण्यासाठी मी महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. याच संदर्भात मी प्रकाश आंबेडकर यांनाही भेटणार आहे. कायदेतज्ञांना देखील भेटणार असल्याचं संभाजीराजेंनी संगितलं.

मराठा समाजासमोर तीन पर्याय आहेत. हे पर्याय सर्व सत्ताधारी आणि विरोधकांनी मान्य केले आहे.

१. review petition फूल प्रूफ रिपोर्ट दाखल करणे
२. रिव्ह्यु याचिका न टिकल्यास क्युरेटीव्ह याचिका दाखल करणे
३. ३४२ ए या कलमाअंतर्गत राज्यपालांमार्फत पुन्हा याचिका दाखल करणे

सारथी संस्थेचे बळकटीकरण

सारथी संस्थेची दुरावस्था झाली आहे. सारथी संस्थेला पूर्ण स्वायत्त दिल्यास आरक्षणापेक्षा अधिक फायदा होऊ शकतो. या संस्थेसाठी कमीतकमी एक हजार कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

आण्णासाहेब महामंडळ

गरीब मराठ्यांना उद्योग उभारण्यासाठी दहा लाखांची मर्यादा वाढवून ती २५ लाखांपर्यंत करण्याची मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CBSE, ICSE 12th Exam SC Hearing|12 वी ची परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेला सुप्रीम कोर्टाकडून 31 मेपर्यंत स्थगिती

SSC Exam | जाणून घ्या दहावीच्या निकालाचे निकष