in

राजस्थानचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या वडिलाचे कोरोनामुळे निधन

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. या निधनामुळे चेतनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चेतनचे वडील कांजीभाई साकारिया यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान आयपीएलच्या स्थगितीनंतर चेतन वडिलांच्या उपचारासाठी घर आणि रुग्णालयाच्या चक्कर मारत होता. चेतनला आपल्या वडिलांसाठी घर बांधायचे होते. परंतु त्याची इच्छा अपूर्ण राहिली.

पदार्पण

चेतनने २०१७-१८ सालच्या विजय हजारे स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पदार्पण केले होते. जडेजा फिट नसल्याने त्याला संधी मिळाली होती. त्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र जडेजाने त्याचे मनोबळ वाढवले आणि पुन्हा एकदा जोमाने मैदानात उतरत दोन गडी बाद केले. चेतनने घरच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत १६ टी-२० सामना खेळले आहेत आणि त्यात त्याने २८ गडी बाद केले आहेत. ११ धावा देत ५ गडी बाद केल्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हेमंत बिस्वा शर्मा होणार आसामचे मुख्यमंत्री; उद्या घेणार शपथ

‘राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची नवी आघाडी तयार करण्याची गरज’