in

आता चेक क्लिअरिंगला वेळ लागणार नाही, RBI चा मोठा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI)चेक क्लिअरिंगबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. येत्या सप्टेंबरपासून बँकांच्या सर्व शाखांमध्ये सीटीएस (Cheque Truncation System) सिस्टीम सुरु होणार आहे. सध्या देशातील काही शहरांमध्येचं सीटीएस पद्धती चेक वटवण्यासाठी वापरली जाते. सीटीएस प्रणालीमुळे चेक क्लिअरिंगला लागणारा दोन ते तीन दिवसांचा कालावधी आता काही तासांचा होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. देशात सध्या 18 हजार बँका सीटीएस प्रणालीच्या बाहेर आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर वित्तीय धोरण सादर करताना ते बोलत होते.

आरबीआयनं भारतात सीटीसी सुविधा 2010 मध्ये सुरु केली होती. सध्या काही शहरांमध्ये सीटीएस सुविधा सुरु आहे. सप्टेंबर 2021 पासून देशातील बँकांच्या सर्व शांखांमध्ये ही सुविधा सुरु होईल. केंद्रीय बँकांनी चेक व्यवहार सुरक्षित होण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरु केली आहे. ही प्रणाली 1 जानेवारी 2021 पासून सुरु झाली आहे. याअंतर्गत 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा चेक वटवला जाणार आहे.

CTS म्हणजे काय?
चेकनं व्यवहार करताना तो ज्या बँकेचा दिलेला असतो त्या बँकेत क्लिअरिंगसाठी घेऊन जावं लागत असे. मात्र, सीटीएस प्रणालीमुळे चेक क्लिअरिंग सोपं आणि जलद झालं आहे. सीटीएस पद्धतीत चेक दुसऱ्या बँकेत घेऊन जावं लागत नाही. चेक ऐवजी त्याचं इलेक्ट्रोनिक प्रतिमा दुसऱ्या बँकेत पाठवली जाते. त्या बँकेकडून मंजुरी आल्यानंतर ग्राहकाच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात. यामध्ये चेक फाटणे किंवा खराब होणे, अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाहीत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोणाबरोबरही फोटो काढण्यासाठी फडणवीस उपलब्ध; खुद्द भाजपा नेतेच सांगतायत

कुठून येतो एवढा confidence? कंगनाचा ट्विटरला बॅन करायचा इशारा