in

CSK vs PBKS : वानखडेत चेन्नई ‘किंग्ज’; पंजाबवर 6 गडी राखून विजय

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जवर 6 गडी राखून सहज मात दिली.चेन्नईने हे आव्हान 15.4 षटकांतच गाठले आणि यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली.

धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र,  पहिल्या सत्रात पंजाबच्या फलंदाजांनी पूर्ण निराशा केली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची भेदक गोलंदाजी आणि इतर खेळाडूंनी केलेल्या दमदार क्षेत्ररक्षणामुळे पंजाबला 20 षटकात 8 बाद 106 धावांपर्यंतच मजल मारता आली. लोकेश राहुल 5, मयंक अग्रवाल 0 , जाय रिचर्डसन 15, मुरुगन अश्विन 6, निकोलस पुरन व दीपक हूडा 0, क्रिस गेल 10, मोहम्मद शमीने 8 धावा केल्या. शाहरुख खान या एकमेव खेळाडूने सर्वाधिक 47 धावा केल्या. या प्रत्युत्तरात षटकात चेन्नईने हे आव्हान 15.4 षटकांतच गाठले आणि यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”कोरोना हवेतून पसरतो”; लॅन्सेटच्या अहवालाने खळबळ

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू; निकालाकडे लक्ष