in

एल्गार परिषदेत वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क

30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेमध्ये विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे पुणे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्वारगेट पोलिसांकडे केली होती. त्यानंतर आता शरजील उस्मानी विरोधात स्वारगेटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची दखल घेऊन त्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘हा’ पण तिरंग्याचाच अपमान ; सामनातून पंतप्रधानांवर निशाणा

शरजीलला आमच्याकडे सोपवा – नितेश राणे