in

Chardham Yatra | चारधाम यात्रा उद्यापासून सुरू होणार

चारधाम यात्रा (१८ सप्टेंबर) उद्यापासून ही यात्रा सुरू होणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज ही घोषणा केली आहे. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे.

चारधाम यात्रेला दिलेली स्थगिती उठवतानाच, कोरोनाविषयक नियमांचे कठोर पालन करून ही यात्रा पार पाडावी, असे निर्देश उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिलेत.चारधाममधील मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा घालण्यासारख्या निर्बंधांसह ही यात्रा सुरू होईल, असे न्यायालयाने यात्रेवरील बंदी उठवताना सांगितलेले आहे.

कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल आणि लसीकरण प्रमाणपत्र यात्रेकरूंसाठी अनिवार्य राहील, असेही न्यायालय म्हटले आहे. मंदिरांभोवती असलेल्या कुंडांमध्ये स्नान करण्याची यात्रेकरूंना परवानगी दिली जाणार नाही असेही न्यायालयाने सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साई संस्थानचं विश्वस्त मंडळ जाहीर; अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे

‘पुढील आढवाड्यात राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता’