in

चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री, हरिश रावत यांची माहिती

शनिवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये सुनील जाखड, सुखजिंदर सिंह रंधावा, नवज्योत सिंग सिद्धू, प्रताप सिंह बाजवा यांची नावं चर्चेत होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि पंजाबमधील काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर झालेल्या बैठकांमध्ये चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

काँग्रेस हायकमांडने चरणजीत सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.


“हा हायकमांडचा निर्णय आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो. चन्नी हे माझ्या लहान बंधूसारखे आहेत. मी अजिबातच नाराज नाही”, असं काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील उमेदवार सुखजिंदर सिंग रंधावा यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL Updates : मुंबईच्या पलटनसमोर धोनीब्रिगेडचे आव्हान!

चार मुलींच्या धाडसाने मुलाचे प्राण वाचले!