in

चंद्रपूरचा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प उद्यापासून पर्यटकांसाठी खुला

अनिल ठाकरे | चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प उद्यापासून 5 दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. ताडोबा व्यवस्थापनाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. 15 एप्रिल 2021 पासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रकल्प बंद करण्यात आला होता.

4 जूनच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरांच्या विविध लेव्हलनुसार सामाजिक- पर्यटन कार्यक्रम राबविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जूनपर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली आहे.  प्रकल्पाच्या विविध 6 प्रवेशद्वारावरून दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती दिली जाणार आहे. ऑनलाईन बुकिंग प्रणाली सुरू नाही. त्यामुळे थेट प्रवेशद्वारावर जाऊन बुकिंग करावे लागणार आहे.

1 जुलैपासून पावसाळी नियमाप्रमाणे ताडोबा कोअर क्षेत्र 3 महिने बंद असणार आहे. ताडोबातील पर्यटन सुरू करण्यासाठी रिसॉर्ट-हॉटेल व्यावसायिक-जिप्सी ऑपरेटर यांचा व्यवस्थापन आणि सरकारवर मोठा दबाव होता. बफर क्षेत्रातील सफारी सुरू करण्यासाठी मात्र  नियमांसह स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अकरावी प्रवेशाबाबत मोठी घोषणा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला