in

चंद्रपूर शहरात 99 इमारती धोकादायक, पालिकेचं स्पष्टीकरण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अतिवृष्टीमुळे कधीही कोसळू शकतात,अशा 99 इमारती चंद्रपूर शहरात असून, त्या त्वरित रिकाम्या कराव्या, यासाठी महापालिकेने सर्व मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्या आहेत. शहरात एकूण तीन झोन असून, यात पहिल्या झोनमध्ये 42, दुसऱ्या झोनमध्ये 35 आणि झोन तीनमध्ये 22 इमारती धोकादायक स्थितीत आहेत.

या इमारतींची सद्यस्थिती आणि वय लक्षात घेऊन या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात यातील बहुतांशी इमारतींना नोटीस देऊन सतर्क केले जाते. मात्र लोकं धोका पत्करून अशा इमारतींमध्ये वास्तव्य करत असल्याचे दिसून येते. या धोकादायक इमारतींमध्ये बहुमजली अपार्टमेंट, वैयक्तिक घरे आणि काही व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत.

या 99 इमारतींमध्ये अतिधोकादायक असलेल्या काही इमारती येत्या दोन दिवसात खाली करण्याची तंबी महापालिकेने नोटिशीत दिली आहे. तसं न केल्यास महापालिका बळजबरीने या इमारती रिकाम्या करणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कंगना रनौतच्या नावाने अटक वॉरंट? न्यायालयाचे संकेत…

कोयना धरणग्रस्त स्थानबद्ध; भारत पाटणकरांनी दिला आंदोलनाचा इशारा