in

“संजय राऊतांनी ‘सव्वा रुपयांची’ रक्कम वाढवावी”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली होती. चंद्रकांत पाटलांच्याच तोंडाला फेस आल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर, आता चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयांच्या मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचं ते म्हणाले.

संजय राऊत हे माझे मित्र आहेत, त्यामुळे ते जे मानहानीचा दावा दाखल करणार आहेत, तो त्यांनी वाढवावा. मानहानीचा दाव्याची रक्कम वाढवावी, कारण, त्यांचा मान फक्त सव्वा रुपयांचा नाही, त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवावी, पण ती सव्वा रुपया नक्कीच नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना चिमटा काढला आहे.

तसेच, मला जेव्हा संधी मिळेल की, सातत्याने रोज बोलणारे, रोज लिहिणारे, हॉस्पीटलमध्ये भरती झाल्यावर सुद्धा, या नावाचा जर अवॉर्ड द्यायचा आहे, तर मी तो अवॉर्ड संजय राऊत यांना देईल, असे म्हणत टोलाही लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण

आज राज्य मंत्रिमंडळ बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा