in

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची जंगलातल्या वाघाशी दोस्ती होती”

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर आता दोन्ही नेत्यांमध्ये खोचक टीकांचं सत्र सुरू झालंय. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा देताना वाघाशी मैत्री होत नसते, वाघ कोणाशी मैत्री करायची हे ठरवतो, असे वक्तव्य केले होते.

आता याला भाजपा प्रदेशाध्यक्षांनी प्रत्युत्तर दिलंय. वाघ आता पिंजऱ्यातला झालाय. आमची जंगलातल्या वाघाशी दोस्ती होती, असा खोचक टोला चंद्रकात पाटील यांनी लगावला आहे.

संजय राऊतांनी दिल्या चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो, असा टोला त्यांनी लगावला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जुलै महिन्यात

Dingko Singh Passed Away; आशियाई सुवर्णपदक विजेता बॉक्सर डिंको सिंह यांचे निधन