in

चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर 54 आमदारांचं पत्र चोरल्याचा आरोप केला!

राज्याच्या राजकारणात सध्या सरकार पाडा-पाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत दोन्ही बाजुंनी अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कलगीतुरा चांगलाच रंगलेला पाहायला मिळत आहे.

जवळपास दोन महिन्यांपूर्वी पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीची धामधूम सुरू होती. त्यावेळी पंढरपूरच्याच प्रचारसभेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं.

“जनतेनं पंढरपुरात यांचा कार्यक्रम करावा, मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो,” असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. अर्थातच महाविकास आघाडीबाबत ते विधान होतं. या घडामोडीपूर्वी राज्यात प्रामुख्याने कोरोना संकटाचीच चर्चा आणि आरोप प्रत्यारोपही त्याच्याशी निगडीत असेच होते. पण या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण पूर्णपणे बदललं आणि सरकार पाडापाडीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. महाविकास आघाडी सरकार आणि भाजप अशा दोन्ही बाजुनं यावरून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना, “सगळे झोपेत असतानाच सरकार कोसळेल आणि कुणाला कळणारही नाही,” अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. या वक्त्यावर टीका करताना “चंद्रकांत पाटलांनी ते वक्तव्य जागेपणी केलं की झोपेत?” असं विचारात अजित पवारांनी पाटलांना टोला लगावला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘नाराजांची संख्या वाढू नये म्हणून भाजपकडून सरकार पाडण्याच्या वल्गना’

पंतप्रधान मोदी सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार