in

3 दिवसांत मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता

येत्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती तीव्र झाल्यास राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज एकूण 15 जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट (IMD Alerts) जारी केला आहे.

आज मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या 15 जिल्ह्यांना मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संबंधित जिल्ह्यात पुढील काही तासांत वेगावान वाऱ्याच्या साथीने जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यात कमी अधिक फरकाने हीच स्थिती कायम राहणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाकरे सरकार महाराष्ट्राची बदनामी करतायत – आशिष शेलार

राज कुंद्राला जामीन मंजूर