in

MEGA BLOCK | दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या ‘मेगा ब्लॉक’

रविवार 30 मे रोजी दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा – मुलुंड अप व डाऊन धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३६ यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटणारी धीम्या मार्गावरील सेवा तसेच माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवली जाईल आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप स्थानकांवर थांबेल.

पुढे या फेऱ्या मुलुंड स्थानकात निर्धारित धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. सकाळी १०.२७ ते दुपारी ३.५५ यावेळेत ठाणे येथून सुटणारी अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार असून, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबा देण्यात येईल. पुढे या फेऱ्या माटुंगा येथे अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

कुर्ला – वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ यावेळेत वाशी, बेलापूर,पनवेलकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. याकाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि वाशी – पनवेल विभागांत विशेष फेऱ्या चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० यावेळेत त्याच तिकीट किंवा पासवर मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021 | अखेर आयपीएलची जागा ठरली!

Maratha Reservation संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात खलबतं