in

केंद्र सरकारनं दिली ७४ कोटी लसींची ऑर्डर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केल्यानंतर आता केंद्र सरकारने मोफत लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी लसीच्या तब्बल ७४ कोटी डोसची ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे.

“केंद्र सरकारने कोविशिल्डचे २५ कोटी डोस, कोवॅक्सिनचे १९ कोटी डोस तर बायोलॉजिकल ई च्या ३० कोटी डोसची मागणी नोंदवली आहे. संबंधित उत्पादकांकडून या डोसचा पुरवठा तातडीने सुरू करण्यात येणार असून डिसेंबरपर्यंत हे सर्व डोस मिळणार आहेत. यातील बायोलॉजिकल ई चे डोस सप्टेंबरपर्यंत मिळतील.” केंद्र सरकारने लसींच्या मागणीसाठी आधीच सिरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेकला ३० टक्के रक्कम अदा केली आहे, अशी माहिती डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ग्रामीण भागात दर्जेदार सेवेसाठी नव्या पदांची भरती… राज्य सरकारचा मोठा निर्णय!

खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसीच्या डोसचे दर निश्चित