in ,

अपयश लपण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवतयं – अजित पवार

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात पेट्रोलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. स्वतःच अपयश लपण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

‘वीज थकबाकी बाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 45000 हजार कोटी थकबाकी शेतकऱ्यांची बाकी होती. शेतकऱ्यांनी आता फक्त 15000 कोटी भरायचे आहेत. 15000 हजार कोटी विलंब चार्जमाफ करण्यात आले आहेत. 15000 कोटी सरकार भरणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

‘राजकारणात कुणी कुणाला धमकी देण्याचा काही प्रश्न नसतो. कार्यकर्त्यांना बरे वाटण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात, असंही अजित पवार म्हणाले. तसेच ‘एल्गार परिषदेबाबत सरकार नरमाईची भूमिका अजिबात घेत नाही आहे. या प्रकरणात शरजील उस्मानी याच्या विरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आपले काम चोखपणे पार पाडत आहे, असंही अजितदादांनी सांगितलं.

केंद्राचा अर्थसंकल्प कुठेही समाधान करणारा नाही आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. सत्ताधारी समर्थन करतील, विरोधक निषेध करतील. नाशिक आणि नागपूरला मेट्रो दिली आहे. पण ठाणे मेट्रोला निधी द्याला हवा होता. पुणे मेट्रोसाठी काही तरी घोषणा करायला हवी होती. ज्या राज्यात निवडणुका झाल्या तिथे निधी कमी दिला आहे. ज्या राज्यात आहे तिथे जास्त निधी दिला आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला आहे, अशी टीकाही अजितदादांनी केली.

अहिंसेच्या अनुषंगाने एखादी व्यक्ती आंदोलन ठिकाणी जात असेल तर त्यांना रोखता कामा नये. जर एखादे भडकाऊ भाषण होणार असेल तर त्यांना रोखू शकतात. पण सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यांना तिथे भेटू द्यायला हवे होते, असंही अजित पवार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘तुम्हाला सेलिब्रेटी कोणी केलं हे विसरलात का’?

अमेरिकेने केले नव्या कृषी कायदयांचे समर्थन अनं कंगनाचा थयथयाट