in ,

लिली अँटिबॉडी कॉकटेलला केंद्राची मान्यता!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक राज्यांना अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला आपातकालीन वापर म्हणून भारतात मान्यता दिल्यानंतर आता अजून एका कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मान्यता देण्यात आली आहे. एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या कोरोना रुग्णांसाठी वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.

शरीरातील कोरोना संपूर्ण नष्ट करण्यात अजून यश आले नाही, तरी कोरोनाच्या विषाणूंचा सामना करणाऱ्या अँटिबॉडी शरीरात तयार करण्याची प्रक्रिया सुरू किंवा वेगवान करण्यासाठी काही औषधांचा वापर केला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लिली कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी इंजेक्शनमध्ये बॅमलॅनिविमॅब आणि इटेसेविमॅब या दोन प्रकारच्या अँटिबॉडी इंजेक्शनचं मिश्रण करून डोस तयार करण्यात आला आहे. या प्रकारच्या मोनोक्लोनल अँटिबॉडीज करोनाच्या विषाणूचा सामना करण्यासाठी शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या अँटिबॉडीजची नक्कल तयार करतात. त्यामुळे शरीराला करोनाच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी मदत मिळू शकते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधानांची 12 वीच्या परिक्षेबाबत बैठकीला सुरुवात..आज निर्णय होणार?

आता विमानतळावर RT-PCR चाचणी बंद