राज्यात आज (शुक्रवार १९ फेब्रुवारी) शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. राज्यातील गडकोटांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. गडांवर आणि शहरांतील चौका-चौकांमध्ये शिवजयंतीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रायगडावरही विद्युत रोषणाई नेत्रदिपक रोषणाई केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवनेरी गडावर उपस्थित असून शिवनेरीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच शिवनेरी आणि जुन्नरमध्ये जमावबंदीचे आदेशही देण्यात आले आहेत.
शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते किल्ल्यावर ३९१ वृक्षांचे वक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच गडावर शिवयोग या विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. कोरोना संकट असल्यामुळे यंदा मोजक्याच लोकांच्या उपस्थित शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरीवर मोजक्या लोकांना सोडण्यात येत आहे. तर जुन्नर आणि शिवनेरीमध्ये जमावबदीचे आदेश दिल्यामुळे मोठा फौज फाटा तैनात केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. दरवर्षी शिवजयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात शिवभक्त शिवनेरीवर महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतात. परंतु कोरोना परिस्थिती असल्यामुळे यावर्षी मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आली. नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद दिला आहे.
Comments
Loading…