in

मनसुख हिरेन-सचिन वाझेंच्या भेटीचे सीसीटीव्ही फूटेज आले समोर…

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा आता होऊ लागला आहे. या प्रकरणात आता एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये मनसुख हिरेन आणि सचिन वाझे एकमेकांना भेटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात हा पुरावा महत्वाचा ठरतो आहे.

सीएसएमटी भागातील सिग्नलवर रोजी मनसुख हिरेन सचिन वाझेंच्या काळ्या मर्सिडीज कारमध्ये बसल्याचं दिसत आहे. जीपीओजवळ गाडी पार्क करुन दोघांमध्ये दहा मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. 17 फेब्रुवारीचे हे फुटेज आहे. एनआयएच्या तपासात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील अनेक गोष्टी उलगडताना दिसत आहेत.

दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनने भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची असल्याचं उघड झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री मनसुख यांना ताब्यात घेऊन ATS अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली होती. यावेळी त्याने आपली गाडी चोरी झाली होती आणि त्याबाबत आपण गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं होतं.मात्र काही दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ममतादिदींच्या प्रचारासाठी शरद पवार तीन दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

फोन टॅपिंग प्रकरण : …अजून पुरावे काय पाहिजेत, जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर निशाणा