in ,

अनिल देशमुखांच्या नागपूरच्या घरी सीबीआयचे छापेमारी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांच्या नागपूरच्या घरी सीबीआयचे छापे टाकण्यात आले आहे.

अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आणि त्यासोबतच त्यांच्या इतरही मालमत्तांवर आयकर विभागाने शुक्रवारी धाड टाकली. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून तब्बल 16 तास झाडाझाडती करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत अनिल देशमुख यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लागला. काही दिवसांपूर्वी मननी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापे सुद्धा टाकले होते. त्यानंतर आज पुन्हा मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांच्या नागपूरच्या घरी सीबीआयचे छापेमारी करण्यात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा ठरली; ‘या’ ठिकाणी होणार मेळावा

मविआचे खासदार संसदेत शेतकरी विरोधी विधेयक मंजूर होत असताना शेपूट घालून का बसले होते?