in

शरद पवारांकडून खबरदारी, पुढील सर्व कार्यक्रम रद्द!

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे.

गर्दी टाळून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सभा, आंदोलने किंवा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 21 फेब्रुवारीला सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या होत्या.

राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी

राज्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सोमवारपासून राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय. तसंच कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात अशा तत्सम कार्यक्रमांचं आयोजन करु नये, अशी तंबीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. आपल्याला एकत्र मिळून लढायचं आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतोय. लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार, लॉकडाऊन ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नव्या कृषी कायद्याविरोधात राहुल गांधींचा एल्गार, आज वायनाड येथे ट्रॅक्टर रॅली

बाबो! एक थाळी संपवा अन् मिळवा एक तोळ सोनं…