कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात असलेली कोरोनाची परिस्थिती पुन्हा राज्यावर ओढवतेय की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिका, ब्रिटन हे समशीतोष्ण कटिबंधातील देश असून, तेथे थंडीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आणि उन्हाळ्यात मात्र कमी झाला असे दिसून आले. याउलट आपल्याकडे उन्हाळ्यात संसर्गाची तीव्रता अधिक होती आणि थंडीत कमी झाली. आता राज्यातील रुग्णसंख्या वाढत असून, येत्या उन्हाळ्यातही संसर्गाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
सध्या आपल्याकडे गेल्या वर्षीच्या जुलैसारखी कोरोनास्थिती आहे. पुढील काही दिवस काटेकोरपणे नियंत्रण केले नाही तर पुन्हा सप्टेंबर २०२० प्रमाणे स्थिती उद्भवू शकेल. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांवर जोमाने भर देणे आवश्यक असल्याचे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.
प्रतिबंधित क्षेत्र..
बाधितांचे प्रमाण १५ टक्क्यांच्या आसपास असलेल्या जिल्ह्यांत तातडीने प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्याची आवश्यकता आहे. तिथे चाचण्या, संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि लसीकरण यांवर भर देणे गरजेचे असल्याची सूचनाही कृती दलाने राज्याला केली.
Comments
Loading…