in

Cash Flew : पैशांचा पाऊस पडला तर काय होईल?

पैशांचा पाऊस पडला तर काय होईल? असा विचार अनेक जण करतात. कॅलिफोर्नियामध्ये अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. अचानक एका ट्रकमधून पैसे उडत रस्त्यावर पडले आणि ते पैसे गोळा करायला लोकांनी गर्दी केली. कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही घटना कार्लसबॅडमधील इंटरस्टेट-5 या महामार्गावर घडली आहे. एका ट्रकमधील पैसे रस्त्यावर उडून आली आणि तिथले लोक गाडीमधून उतरून ते पैसे गोळा करण्यासाठी जमा झाले होते. त्यामुळे महामार्गावर ट्रॅफिक जॅम झाले.

कॅलिफोर्नियाचे अधिकारी कर्टिस मार्टिन यांनी आउटलेट केएनएसडीला दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा एक दरवाजा उघडला आणि त्यामधून नोटा उडू लागल्या. त्यानंतर ट्रकमधील पैसे रस्त्यावर पडली. कॅलीफोनिया यांनी सांगितले की, पैसे उचलणाऱ्यांना दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच इतरांनादेखील अटक होऊ शकते. कॅलीफोर्नियाने लोकांना ते पैसे परत देण्यास सांगितले आहेत.

दोघांना अटक

कायदा प्रवर्तन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ट्रकमधून उडालेले पैसे उचलणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी असलेल्या गाड्यांच्या नंबर प्लेट आणि लोकांचे चेहरे पाहून त्यांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. डेमी बागबी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावर पैसे पडलेले दिसत आहेत. या व्हिडिओला डेमी बागबी यांनी कॅप्शन दिले, ‘तुम्ही असे दृष्य कधी पाहिले आहे का? हे पाहिल्यानंतर तुम्ही काय केले असते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ST Strike : ‘संप मागे घ्या,न्यायालयाच्या अहवालावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल’

वाघिणीच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू; ताडोबात व्याघ्र प्रगणना कार्यक्रम सुरू असताना हल्ला