in

प्रवीण दरेकरांच्या कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंती सोहळा कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल झाला. कोरोनाकाळात गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये आज आद्यक्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळा कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला होता. ह्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता, तर अनेकांच्या तोंडावर मास्कदेखील नव्हता.

कोरोना प्रतिबंधक नियमावली दिली असताना त्याला आयोजकांकडून तिलांजली देण्यात आली. ह्या प्रकरणी मच्छिंद्र बोडरे व दिनेश चव्हाण या आयोजकांवर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परराष्ट्र मंत्र्यांचं UN मध्ये वक्तव्य; म्हणाले…

S.v.road Bhayandar east