in ,

आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त; नव्या अभ्यासातून माहिती

कोरोना संकटात अनेकांचे मृत्यू होत आहेत. आता यासंदर्भातील एक अहवाल समोर आला आहे. आळशी लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. संशोधनात्मक अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे आळशी लोकांसाठी हा धोक्याचा इशाराच आहे.

व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं तीव्र असून अशा लोकांना मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधीपासून ज्या व्यक्तींनी व्यायाम करणं सोडून दिलं. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागत असून त्यांना आयसीयूमध्ये भरती करावं लागत आहे, असंही अभ्यासातून दिसून आलं आहे.

दरम्यान, या संशोधनासाठी ५० हजार कोरोनाबाधितांचा अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब असलेल्यांना कोरोना संसर्ग आणि त्यामुळे जीविताचा धोका अधिक असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, शारीरिक हालचाली न करणं यामुळेही कोरोना होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे.

कुठलाही व्यायाम न करणाऱ्या ४८ हजार ४४० लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं अधिक दिसून आली. यात काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं. अनेकांना अतिदक्षता विभागात भर्ती करण्यात आलं. यातील काहींचा मृत्यूही झाला. जानेवारी आणि ऑक्टोबर २०२० मध्ये अमेरिकेत या विषयावर अभ्यास करण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Break The Chain : राज्यात आज रात्री 8 पासून काय सुरु, काय बंद?

CBSE Board Exams: १० वीच्या परीक्षा रद्द… तर १२वीच्या परीक्षा स्थगित