in

राणा दाम्पत्याला बुलेटवारी महागात; अखेर गुन्हा दाखल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राणा दाम्पत्यानं कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत बुलेटवरून फेरी मारली होती. त्यांच्या या बुलेटस्वारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा ठरला होता. यानंतर काही लोकांनी सर्वसामान्य आणि विशेष लोकांना न्याय वेगळा असतो का, असा सवाल उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आता राणा दाम्पत्य आणि इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाला मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच आता पोलिसांनी प्रत्येक दुचाकी स्वारांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मात्र, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे चित्र समोर आलं होतं. राणा दाम्पत्याने विनामास्क आणि विनाहेल्मेट अमरावतीत बुलटेवरून फेरफटका मारल्याचा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल होत आहे.

अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम कडक केले आहे. त्यामुळे वाहनांवर प्रवास करत असताना प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे लोक मास्क लावत नाहीत, अशा वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. राणा दाम्पत्यावर पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत होते. अखेर अमरावती पोलिसांनी राणा दाम्पत्य आणि इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जीएसटी भरपाईपोटी राज्यांना ऑक्टोबरपासून एक लाख कोटींचे केंद्राकडून वितरण

पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला 12 दिवसांनंतर ब्रेक; जाणून घ्या दर