in

आणि मुली झाल्या सक्षम….

अरविंद जाधव, प्रतिनिधी
राज्यात आज काल अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने युवतींना स्व- बचावाचे धडे देण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे . महिला तसेच अल्पवयीन मुलींवरील अत्याचार चिंतेची बाब बनत चालाली आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा विशेष प्रयत्न करुन देखील असे प्रकार आटोक्यात येत नसल्याने. आता सरळ महाविद्यालयीन युवतींना शाररीक बचावाचे प्रशिक्षण देण्यासाठी सातारा जिल्हा पोलिस दलाने कंबर कसली आहे.

या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात पोलिस दलातील परिपक्व तज्ञांच्या साह्याने हे प्रशिक्षण दिले जाते यामध्ये ज्युडो कराटे तसेच अनेक बचाव शिक्षण दिले जाते. विशेष करुन सातारा ग्रामीण भागातील मुलींना याचा फायदा होताना दिसत आहे.

कोरोनाचे नियम असल्यामुळे महाराजा सयाजीराव महाविद्यालयातील निवडक मुलींनी या प्रशिक्षणात भाग घेतला. सदर प्रशिक्षण हे सकाळी १ तास घेतले जाते. तसेच याचा कालावधी १२ दिवसांचा राहतो. या प्रशिक्षणानंतर सदर युवती आपल्या सहकारी विध्यार्थींनी यांना हे प्रशिक्षण देऊ शकतात. अलिकडे सातारा जिल्हा पोलिस दलास उत्कृष्ठ कामगिरी बद्दल ग्रामीण प्रवर्गातून पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे. स्व बचावासाठी युवतींना प्रशिक्षण दिल्याबद्दल आज महाविद्यालयीन मुलींनी साक्षी विजय पवार सह ना.शंभूराज देसाई यांच्या देखील शुभेच्छा दिल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोणार्क एक्स्प्रेस मध्ये आढळले 21 किलो अमली पदार्थ

धक्कादायक खुलासा! विराटचं संतुलन ढासळतंय