in

कर्करोगग्रस्त तरुणीसाठी धावून आलं गाव

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील १७ वर्षीय वंशिका महाजन ही एका दुर्धर आजाराने ग्रस्त होती. वंशीकाच्या उपचारासाठी घरची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने गावातील तरुणांनीचं पुढाकार घेत आर्थिक मदतीसाठी चळवळ उभी केली.

वंशिकाला चक्कर आल्याने तिला अमळनेर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी वंशिकाचे काही रिपोर्ट काढून तपासणी केली मात्र तपासणीअंती वंशिकाला ब्लड कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे वंशिकाच्या आई-वडिलांना धक्काच बसला.

डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्याचा सल्ला दिला, मात्र घरात गरिबी असल्यामुळे हा पर्याय वंशीकाच्या परिवाराकडे उपलब्ध नव्हता. परंतु या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला आहे. वंशिकाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीकरिता गावात झोळी फिरून पैशांची जुळवा जूळव करत, याच पैशातून तरुणांनी वंशीकाला नाशिक येथे उपचारासाठी हलवले.

गेल्या आठ दिवसापासून वंशिकावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र वंशिकाच्या उपचारासाठी जवळपास नऊ ते दहा लाखांची गरज आहे. त्यातच गावात झोळी फिरवून व सोशल मीडियावर मदतीचे आव्हान करून तरुणांनी 50 हजारापर्यंत रक्कम जमा होऊ शकली आहे. मात्र जमा झालेली ही रक्कम अतिशय कमी असून कळमसरे गावातील तरुण वंशिकाला मदत मिळण्याकरता प्रयत्न करत आहेत.

वंशिका ही गेल्या आठ-दहा दिवसांपासून नाशिक येथे खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अशातच वंशिकाचा जीव वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधी, तसेच समाजातील सर्व स्तरातील दाते यांनी पुढाकार घेवून वंशिकाला मदत करावी असे आव्हान कळमसरे गावातील तरुण व ग्रामस्थ करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यामध्ये येत्या 3 वर्षांत राबविणार मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम, मंत्रिमंडळाचा निर्णय

Birthday Special: पाहा उर्मिला मातोंडकरचा हटके अंदाज