in

यंदा आषाढी वारी कशी होणार? मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

यंदाच्या आषाढी वारीसाठी सोमवारी पुणे येथे झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने आता हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळात घेतला जाणार आहे. एका बाजूला कोरोनाचे राज्यावरील संकट कायम आहे, रोज नवनवीन स्ट्रेन सापडत आहेत यातच तिसऱ्या लाटेचे संकेत जागतिक आरोग्य यंत्रणा देत असताना यंदा आषाढी पायी वारी करू नये अशी प्रशासनाची ठाम भूमिका आहे.

सोमवारी पुणे येथे सर्व पालखी सोहळे, वारकरी प्रतिनिधी आणि प्रशासन यामध्ये झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने आता हा निर्णय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट समोर ठेवण्याची वेळ आली आहे. आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी आषाढी वारी रद्द झाली होती. यंदाही वारीवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pune MIDC Fire : कंपनी मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Fire Eclipse: आज 10 जूनला दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतातल्या ‘या’ मोजक्या शहरात दिसणार