पर्यटन धोरण-2016मधील तरतुदीनुसार तसेच कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खासगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे दोन भाग या धोरणात असून पर्यटनाबरोबरच रोजगार देखील वाढेल.
पर्यटन धोरण 2016अंतर्गत मुद्रांक शुल्कामध्ये सूट, राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट इत्यादी कॅरॅव्हॅन पार्क, कॅरॅव्हॅन पर्यटनाकरिता लागू राहतील. पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी करणे बंधनकारक राहील. या पर्यटन संकल्पनेमुळे पर्यटकांना राहण्याची सुविधा तसेच खासगी गुंतवणुकीसह प्रोत्साहन मिळेल.
कॅरॅव्हॅन पार्क : यामध्ये मुलभूत सोयी सुविधांनि युक्त अशा जागेवर कॅरॅव्हॅन पार्क उभे करून मुक्काम करता येईल. यामध्ये लहान-मोठ्या आकाराच्या कॅरॅव्हॅन उभ्या करता येतील. असे पार्क खासगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीन मालक किंवा विकासक उभारु शकतील. वाहनतळाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा तसेच स्वतंत्र पाणी, रस्ते व वीजजोडणी असेल.
कॅरॅव्हॅन : या व्हॅन्समध्ये बेडची सुविधा असलेले किचन, टॉयलेट, सोफा, टेबल असून विश्रांती आणि निवासाच्या दृष्टीने त्याची बांधणी केली असेल. सिंगल एक्सेल कन्व्हेंशल कॅरॅव्हॅन, टि्वन एक्सल कॅरॅव्हॅन, टेन्ट ट्रेलर, फोल्डिंग कॅरॅव्हॅन, कॅम्पर ट्रेलर अशा प्रकारचे कॅरॅव्हॅनचे विविध प्रकार असतील.
Comments
Loading…