in

CA परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल

लोकशाही न्यूज नेटवर्क

इनस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियानं सीए परीक्षा 2020 चा निकाल जाहीर केला आहे. आयसीएआयनं सीए फाऊंडेशन आणि सीए इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल (ICAI CA Foundation Result 2020) अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर घोषित केला आहे. सीए फाऊंडेशन आणि इंटरमिडिएट परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आयसीए शिवाय caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटसवर देखील (ICAI CA Intermediate Result 2020) निकाल पाहायला मिळेल. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून निकाल पाहता येईल.

सीए फाऊंडेशन आणि इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. इंटरमिडिएट ओल्ड कोर्ससाठी CAIPCOLD_ (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाका. त्यानंतर हा मेसेज 57575 वर पाठवावा लागेल. त्यानंतर असाच मेसेज फाऊंडेशन चा निकाल पाहण्यासाठी CAFND_ (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाकून 57575 वर पाठवून द्या.

निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार

विद्यार्थ्यांना जर सीए फाऊंडेशन आणि सीए इंटर निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना [email protected], [email protected] या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!’ ट्विटरप्रकरणावरून भाजपाचा राज्य सरकारवर निशाणा

114 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत… दुसऱ्या डावात अश्विनचे सहा बळी