in

नोकिया कंपनीची धमाकेदार ऑफर; Nokia 7.2 खरेदीवर आता मिळणार ‘हा’ स्मार्टफोन ‘फ्री’

Share

सध्या स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच स्मार्टफोन चाहत्यांसाठी नवनवीन ऑफर देखील घेऊन येत आहेत. एचएमडी ग्लोबलने आपल्या ग्राहकांसाठी अशीच एक धमाकेदार ऑफर आणली आहे. नोकिया (Nokia) 7.2 च्या खरेदीवर आता ग्राहकांना आणखी एक स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना एक जबरदस्त जॅकेट देखील मिळत आहे. नोकिया 7.2 (6 जीबी रॅम) स्माटफोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना कंपनी केस, जॅकेट, आणि नोकियाचा सी1 मोबाईल मोफत मिळत आहे. ही ऑफर फिलिपिन्स ग्राहकांसाठी आहे. फिलिपिन्स मध्ये हा फोन 15 हजार 990 पीएचपी म्हणजेच 285 यूरो इतकी आहे.

नोकिया 7.2 (6 जीबी रॅम) या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये रिअरमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. तर, बॅकला (48 + 8 + 5) मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येतो. फोनमध्ये 3 हजार 500 एमएएच बॅटरी दिली आहे. 

नोकिया C1 (Nokia C1) स्मार्टफोन अँड्रॉयड 9 पाय गो एडिशनवर चालतो. नोकिया सी1 फोनमध्ये 5.45 इंच FWVGA IPS डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 16 जीबी मेमरी देण्यात आला आहे. याशिवाय मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 64 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये दोन्ही कॅमेऱ्यासोबत फ्लॅश दिला आहे. तसेच 2 हजार 500 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेत मोठी भरती

Sai Tamhankar Birthday Special: वाढदिवसानिमित्त सई ताम्हणकर हिच्या बोल्ड फोटोजची झलक!