in

Watch Video; चोरट्यांनी फोडले मेडिकल दुकान; सीसीटीव्हीत घटना कैद

मयुरेश जाधव | बदलापूरमध्ये चोरट्यांनी मेडिकल फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी महागड्या बॉडी स्प्रे आणि फेस वॉशची चोरी करून पोबारा केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

कात्रप परिसरात असलेल्या प्रकाश मेडिकल स्टोअरमध्ये मंगळवारी पहाटे ही चोरीची घटना घडली. या दुकानात पहाटे साडेतीनच्या सुमारास तीन चोरटे शटर उचकटून घुसले. आधी त्यांनी ड्रॉव्हर उघडून पैसे शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे न सापडल्यानं त्यांनी महागडे परफ्युम, बॉडी स्प्रे, फेस वॉश लांबवले.

दरम्यान चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यातील शेतकऱ्यांना मिळाला सोयाबीन पिक विम्याचा लाभ

Organ Donation |वर्धात मरणोत्तर अवयवदानाने चार व्यक्तींना जीवनदान