in

Budget session LIVE | आरोग्य विभागासाठी 7 हजार २०० कोटी रूपयांची तरतूद

आज राज्याचा अर्थसंकल्प महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत सादर करत आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. यावेळी आरोग्य सेवेसाठी 7 हजार 200 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच ५ हजार कोटी आरोग्य विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य व्यवस्थेसाठी विविध तरतूदी

राज्यातील ११ परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार येणार. लातूरच्या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी ७३ कोटी देणार. ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय बनवणार. मोशी येथे आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार. आरोग्य विभागास यंदा २९०० कोटी रुपये सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. तर वैद्यकीय शिक्षण विभागास १५१७ कोटी देणार, असं अजित पवार म्हणाले.

राज्याचा अर्थसंकल्प LIVE

शेतकऱ्यांसाठी सरकारची कर्जमुक्ती योजना

 • ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी
 • शेतकऱ्यांना शून्य% व्याजाने कर्ज
 • कृषी पंप जोडण्यासाठी १ हजार ५०० कोटी
 • एमपीएमसी बळकटीकरणासाठी २ हजार कोटी
 • विकेल ते पिकेल धोरणासाठी २ हजार १०० कोटी
 • बाळासाहेब कृषी प्रकल्प राबवणार
 • संत्रा उत्पादकांसाठी अन्नप्रक्रिया उद्योग
 • ५०० भाजीपाला रोपवाटिका उभारणार
 • शेतमाल प्रक्रिया सुधरण्यासाठी १ हजार कोटी
 • कृषी संशोधनासाठी ४ कृषी विद्यापीठाना २०० कोटी
 • सहकार पणन खात्यासाठी १ हजार २८४ कोटी
 • पशुसंवर्धन मस्त्य विभागास ३७०० कोटी
 • २६ सिंचन प्रकल्पाची कामे सुरु
 • ग्रामीण कृषी योजने अंतर्गत गोठे बांधण्याची तरतूद
 • १२ धरणांच्या बळकटीसाठी ६२४ कोटींची तरतूद
 • २३ डिसेंबर अखेर पर्यंत धरणाची कामे पूर्ण करणार
 • आपत्ती व्यवस्थापनासाठी ११३१५ कोटींची तरतूद
 • नांदेड जालना २०० किलोमीटरचा नवा महामार्ग निर्माण करणार
 • मुंबई गोवा सागरी मार्गासाठी ९५४० कोटींची तरतूद

पूर्व मुक्त मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव
ग्रामविकास मंत्रालयाला ७३५०कोटींची तरतूद

परिवहन विभागासाठी २५७० कोटींची तरतूद

 • बस स्थानक विकासासाठी १ हजार ४०० कोटी
 • अति जलद २६ रेल्वे स्थानक उभारणार
 • पुणे नगर रेल्वे नाशिक मार्गासाठी १६ हजार कोटी
 • एसटीच्या आधुनिकीकरणा १४०० कोटी
 • ठाण्यात ७५०० कोटी मेट्रो प्रकल्प
 • पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार
 • सातारा सैनिक शाळेला तरतूद ३०० कोटी
 • घरकुल योजनेसाठी ६८५२ कोटी
 • उच्च शिक्षण विभागास १३०० कोटींची तरतूद
 • नेहरू सेंटरला १० कोटींची तरतूद
 • क्रीडा विभागासाठी २४०० कोटी
 • स्वछता आणि पाणीपुरवठा विभागास २५३३ कोटींची तरतूद

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माळढोक पक्षी अभयारण्याजवळ वणवा

Maharashtra Budget 2021 LIVE : ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ : अजित पवार