अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज राज्यसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी खासदारांनी इंधर दरवाढ, घरगुती गॅस दरवाढ अशा वेगवेगळ्या विषयांवर सरकारला घेरलं. या मुद्यावर राज्यसभेत जोरदार गोंधळ झाल्यामुळे सदनाचं कामकाज तासाभरासाठी स्थगित करण्यात आलं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू झाल्यानंतर राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाझलेल्या किंमतींचा मुद्दा उचलून धरला. सदनाचं कामकाज स्थगित करत या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.
आज संपूर्ण देशातील लोक चिंतेत आहेत. आम्ही सभापतींकडे मागणी करतो की सदनाचं कामकाज स्थगित करून पेट्रोल डिझेल्च्या किंमतींवर चर्चा केली जावी. आज देशात पेट्रोल १०० रुपयांवर तर डिझेल जवळपास ८० रुपये प्रती लीटरवर पोहचलंय, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं. नागरिकांना इंधन, गॅस दरवाढीसंदर्भात सरकारचं म्हणणं ऐकायचंय, असं विरोधकांनी म्हटलं.
Comments
Loading…