in

Budget Session | महिलादिनी अर्थमंत्र्यांकडून बजेटमध्ये मोठी घोषणा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान उभी आहेत. यावेळी बजेटमध्ये ८ मार्च महिलादिना दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील माता-भगिणी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा

स्त्री नसते केवळ वस्तू, ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकवावा माथा, असं म्हणत अजित पवारांनी एक घोषणा केली. नवीन घरं विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार. पण, घर महिलेचा नावावर असलं पाहिजे, असं पवार म्हणाले. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Budget 2021 LIVE : ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ : अजित पवार

Maharashtra Budget | मुंबईतील कोस्टल मार्ग 2024 पर्यंत पूर्ण करणार – अजित पवार